Home महाराष्ट्र Rape | धक्कादायक: धावत्या ST बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape | धक्कादायक: धावत्या ST बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape of a minor girl in a running ST bus

भंडारा | Bhandara: भंडाऱ्यात एका अल्पवयीन मुलीवर धावत्या एस.टी. बसमध्ये बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला फिरायला घेऊन गेला असता, त्याने हे कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. राजेश मडावी (वय १९ रा. बोदरा ) असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपीने पीडित मुलीला नागपूरला फिरायला जात असल्याचा बहाणा करून साकोली येथून बसने नेले. रात्रीची वेळ आणि बसमध्ये वाहक नसल्याचा गैरफायदा घेत आरोपीने बसमधील शेवटच्या सीटवर धावत्या बसमध्येच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. दरम्यान,  तो नागपूमधील आपल्या नातेवाईकांकडे घेऊन गेला. मात्र नातेवाईकांना या आरोपीच्या हालचाली संशयित वाटल्याने त्यांनी राजेशला ताबडतोब घरातून बाहेर काढलं. त्यामुळे आरोपी राजेश अल्पवयीन विद्यार्थिनीसह रात्रीच बोदरा येथे परत आला.

दरम्यान, या मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला असता, बोदराच्या पोलीस पाटलांनी बेपत्ता मुलगी राजेशसोबत गावातच असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बोदरा गाव येथे जाऊन मुलगी आणि राजेशला ताब्यात घेतलं. दोघांचीही साकोली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तपासणीनंतर पोलिसांनी आरोपी राजेश याच्यावर गुन्हा (Crime) दाखल केला आहे. अधिक तपास साकोली पोलीस करीत आहेत.

Web Title: Rape of a minor girl in a running ST bus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here