Home पुणे लॉज मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायांवर पोलिसांचे छापे

लॉज मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायांवर पोलिसांचे छापे

Breaking News | Shirur: शिरुर शहरातील वेश्या व्यवसायांवर पोलिसांचे छापे, तिघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे.

Police raids on prostitution businesses operating in lodges

शिरूर: शिरुर शहराच्या मध्यवर्ती वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या महाराजा लॉज आणि मसाई श्रेयांस लॉज मध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर शिरुर पोलिसांनी छापे टाकत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या पथकातील दर्शन

दुगड यांनी साध्या वेशामध्ये पुणे-नगर महामार्गावरील हॉटेल तसेच लॉजेसमध्ये चालणाऱ्या अवैध धंद्यांबाबत माहिती मिळवून ती अधिक्षकांना दिली होती. अधिक्षकांच्या आदेशानुसार शिरुर येथील महाराजा लॉज आणि साई श्रेयांस लॉज या दोन्ही लॉजवर शिरुर पोलिसांनी कारवाई करत दिपक शंकरलाल उपाध्याय (रा. सुशीला पार्क, शिरुर) विमल बागवान टेलोत (वय ४२) (रा. पिंडवाल ता. आसपुर जि. डोंगरपुर, राजस्थान, सध्या रा. महाराज लॉज, शिरुर) आणि अशोक गंगाधर उबाळे (५०, रा. साई श्रेयांस लॉज, शिरुर) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु वेश्याव्यवसाय चालविण्यासाठी लॉज भाड्याने देणाऱ्या लॉज मालकांवर शिरुर पोलिस गुन्हा दाखल करणार का? अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा चालू आहे. शिरुरचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांना याबाबत विचारलेअसता त्यांनी सांगितले की, शिरुर येथील वेश्या व्यवसाया संदर्भात तीन जणांवर गुन्हे दाखल केले असुन अजुनही काही आरोपीना अटक करणे बाकी आहे. तसेच लॉज मालकांनी जो भाडेकरार केलेला आहे. त्यात काय नियम आणि अटी आहेत. ते सविस्तर पाहुन पुढील तपासात कारवाई बाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Web Title: Police raids on prostitution businesses operating in lodges

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here