Home महाराष्ट्र प्रवीण दरेकरांची अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळली

प्रवीण दरेकरांची अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळली

Praveen Darekar's pre-arrest bail plea rejected

मुंबई:  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेपासून दिलासा मिळालेला नाही. मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका धाव घेतली होती. मात्र,  उच्च न्यायालयाने दरेकरांची ही याचिका फेटाळून लावली आहे.

प्रवीण दरेकर हे मजूर नसतानाही त्यांनी मजूर असल्याचं दाखवत मुंबै बँक निवडणूक लढवली. त्यावरुन एमआरआय मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरु आहे. या प्रकरणात कठोर कारवाई होऊ नये आणि दिलासा मिळावा यासाठी दरेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र,  ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अटकपूर्व जामीनासाठी जे योग्य कोर्ट आहे तिथे दरेकर दाद मागू शकतात, असंही उच्च न्यायालयाने म्हटलंय. त्यामुळे आता दरेकर कोणत्या कोर्टात धाव घेणार हे आता पाहावं लागणार आहे.

Web Title: Praveen Darekar’s pre-arrest bail plea rejected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here