Home अहमदनगर विधवा महिलेस तू मला आवडतेस, माझ्याशी संबंध ठेव असे म्हणत….

विधवा महिलेस तू मला आवडतेस, माझ्याशी संबंध ठेव असे म्हणत….

Widowed women Molestation in Rahuri factory

Ahmednagar | Rahuri | राहुरी: विधवा महिलेकडे पाहून अश्लील हावभाव केले. आणि  तू मला आवडतेस, माझ्याशी संबंध ठेव असे म्हणत विनयभंग (Molestation) केल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे दि. 12 मार्च रोजी घडली.

याप्रकरणी विधवा महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून फिर्यादीत म्हटले,  सदर महिला तिच्या कुटुंबासह राहुरी फॅक्टरी येथे राहते. ती एक दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असते. उत्तम शिंदे हा नेहमी त्या महिलेचा पाठलाग करून तिच्यावर पाळत ठेवत असे.  दि. 12 मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान ती महिला दुकानात असताना उत्तम शिंदे रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी हा दुकानाच्या समोर आला. त्या महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करू लागला. त्यावेळी ती महिला त्याला म्हणाली, तू नेहमी माझा पाठलाग का करतोस?  अशी विचारणा केली. तेव्हा त्याने तिला शिवीगाळ करून तू मला आवडतेस, तू माझेशी संबंध ठेव. नाहीतर तुला मी इथे राहू देणार नाही.

या फिर्यादीवरून आरोपी उत्तम शिंदे ,रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी याच्या विरोधात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार डी. एन. गर्जे करीत आहेत.

Web Title: Widowed women Molestation in Rahuri factory

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here