Home क्राईम ‘आधार’ काढण्याच्या बहाण्याने शाळेतून  नववीतील मुलीला नेले शेतात अन….

‘आधार’ काढण्याच्या बहाण्याने शाळेतून  नववीतील मुलीला नेले शेतात अन….

Solapur Crime:  आधारकार्ड काढायचे आहे, असे सांगून तिला आपल्या सोबत शेतात घेऊन जाणाऱ्या तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

pretext of withdrawing 'Aadhaar', the ninth-grade girl was taken to the farm from school

सोलापूर : शाळेत गेलेल्या मुलीला तिचे आधारकार्ड काढायचे आहे, असे सांगून तिला आपल्या सोबत शेतात घेऊन जाणाऱ्या तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित मुलीच्या पित्याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संजय लक्ष्मण गुळगे (रा. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी ही एका शाळेत नववीमध्ये शिकत आहे. तिच्या शाळेत जाऊन आरोपी मुलाने तिचे आधारकार्ड काढायचे आहे, असे खोटे सांगितले. यामुळे तिला शिक्षकांनी शाळेतून सोडले. आरोपीने तिला खाऊसाठी ५० रुपये देतो, असे सांगून शाळेपासून काही अंतरावर असलेल्या शेतात नेले. या घटनेची माहिती पीडितेच्या पित्याला कळल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी आरोपीला वारंवार फोन केला तेव्हा आरोपी  पिडीतेला तेथेच एकटीला सोडून गेला अशी फिर्याद वडिलांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: pretext of withdrawing ‘Aadhaar’, the ninth-grade girl was taken to the farm from school Crime Filed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here