Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: वडिलांनीच केला स्वतःच्या  मुलाचा खून

अहमदनगर ब्रेकिंग: वडिलांनीच केला स्वतःच्या  मुलाचा खून

Ahmednagar News:  दारू पिऊन वडिलाने मुलाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून खून (Murder) केल्याची घटना.

The Father Murder his own son

कर्जत | Karjat : कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे.  दारू पिऊन वडिलाने मुलाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून खून केल्याची घटना बुधवारी (दि. १२) दुपारी तीनच्या सुमारास घडली. याबाबत मिरजगाव (ता. कर्जत) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अमोल रोहिदास लाढाणे असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.  डिकसळ येथील रोहिदास बापूराव लढणे आणि त्याचा मुलगा अमोल रोहिदास लाढाणे हे दोघे बाप-लेक दोघेही बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास दारू पिऊन घरी आले होते. घराच्या पत्र्याच्या पडवीत बसले असता त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. यावेळी मुलाची आई विमल व पत्नी अश्विनी यांनी भांडण करू नका. शांत बसा, असे सुनावले. मात्र अमोल याने वडील रोहिदास यांना शिवीगाळ करण्यास व हाणामारी करण्यास सुरुवात केली. या झटापटीत अमोल हा पडवीच्या ओट्यावरून खाली पडला. खाली पडल्यावर मुलगा अमोल याने आणखी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रागाच्या भरात वडील रोहिदास लाढाणे याने मुलगा अमोलच्या तेथेच पडलेला एक ब्लॉक डोक्यात घातला,  तसेच दुसरा ब्लॉक तोंडावर टाकून  खून केला.  असे विमल रोहिदास लाढाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीवरून रोहिदास बापूराव लाढाणे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी कर्जतचे पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी भेट दिली. घटनेचा अधिक तपास मिरजगावचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे करीत आहेत.

Web Title: The Father Murder his own son

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here