Home अहमदनगर Accident: मोहटा देवस्थानचा पुजारी, कर्मचारी अपघातात ठार

Accident: मोहटा देवस्थानचा पुजारी, कर्मचारी अपघातात ठार

Ahmednagar | Pathardi: हंडाळवाडीतील घटना : दुचाकी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक (Accident).

Priest of Mohta temple, an employee killed in accident

पाथर्डी:  तालुक्यातील हंडाळवाडी शिवारात दुचाकी व प्रवासी वाहतूक करणारे वाहन (मॅक्स) यांची धडक होऊन मोहटा देवस्थानचा पुजारी, कर्मचारी असे दोघे ठार झाले. ही घटना रविवारी (दि. ७) सायंकाळ साडेपाचच्या सुमारास घडली.

मोहटा देवस्थानचे पुजारी विवेक ऊर्फ राजूदेवा भानुदास मुळे, कर्मचारी कैलास बाबासाहेब शिंदे अशी मृतांची नावे आहेत.

सायंकाळी ५.३० च्या सुमारास पाथर्डी शहरातील चौकात मॅक्स चारचाकी वाहनाचा रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनाला धक्का लागला. त्यानंतर मारहाणीच्या भीतीने मॅक्सच्या चालकाने वाहन वेगाने पळविले. हंडाळवाडी शिवारात मोहटादेवी देवस्थान येथून पाथर्डीकडे दुचाकीवरून येत असलेले मोहटादेवी देवस्थानचे पुजारी विवेक ऊर्फ राजूदेवा मुळे, कर्मचारी कैलास शिंदे यांना मॅक्स वाहनाने उडविले. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघातात मुळे व शिंदे हे जागीच ठार झाले. अपघात झाल्यानंतर मॅक्सचा चालक घटना ठिकाणाहून पसार झाला.

Web Title: Priest of Mohta temple, an employee killed in an accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here