Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय, पोलिसांचा छापा, परप्रांतीय तरुणीची सुटका, दोघांना अटक

अहमदनगर ब्रेकिंग: हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय, पोलिसांचा छापा, परप्रांतीय तरुणीची सुटका, दोघांना अटक

Ahmednagar News: केडगाव बायपास रोडवरील वेश्याव्यवसाय (Prostituiton) करणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा, कोतवाली पोलिसांची कारवाई, तरुणीची सुटका, दोघांना अटक.

Prostitution in hotel, police raid, rescue of migrant girl, two arrested

अहमदनगर: केडगाव बायपासवरील हॉटेल राधेश्याममध्ये सुरू असलेल्या कुंटनखान्यावर छापा टाकत कोतवाली पोलिसांनी एका परप्रांतीय तरुणीची सुटका केली असून हॉटेल मालकासह दोघांना अटक केली. पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी केली.

अकाश सुभाष गायकवाड (२४, रा. भिंगारदिवे मळा, झोपडी कॅन्टीन, नगर) व शहानवाज वहाब हुसने (२१, रा. तपोवन रोड, नगर) असे अटक केलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. केडगाव बायपास परिसरातील हॉटेल राधेश्याम येथे वेश्या व्यवसाय सुरू आहे, अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. या आधारे पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी तळघरात वेश्या व्यवसाय सुरू होता. पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी हॉटेल मालक सुरज यांच्या सांगण्यावरून ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना रूम उपलब्ध करून वेश्या व्यवसाय करत असल्याची कबुली दिली.  हॉटेलमधून ३३ हजार रुपये २३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक मनोज कचरे, गजेंद्र इंगळे, पोलिस अमलदार तनवीर शेख, राजेंद्र औटी, गणेश धोत्रे, गोरख काळे, योगेश भिंगारदिवे, अभय कदम, सलीम शेख, संदीप थोरात, अमोल गाढे, सुज हिवाळे, कैलास शिरसाठ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Prostitution in hotel, police raid, rescue of migrant girl, two arrested

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here