Home Accident News मित्राच्या लग्नाला जाताना काळाचा घाला, कार अपघात तिघे ठार

मित्राच्या लग्नाला जाताना काळाचा घाला, कार अपघात तिघे ठार

Ahmednagar News: मित्राच्या लग्नाला बीडला येत असताना कारला अपघात (Accident) झाला. यात तिघे मित्र जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी.

Three killed in a car accident while going to a friend's wedding

नेवासा: मित्राच्या लग्नाला बीडला येत असताना कारला अपघात झाला. यात तिघे मित्र जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला असून, त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे. सर्व मयत अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हा अपघात बीड तालुक्यातील पेंडगावजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला.

मित्राच्या लग्नाला जात असताना एका भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात झाला आहे. कार भरधाव वेगात असतांना चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने कारने पलट्या खाल्ल्या आहेत.

यात नेवासा (Nevasa) येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. धीरज गुणदेजा (वय 30), रोहन वाल्हेकर (वय 32), विवेक कांगुने (वय 33) अशी मृतांची नावे आहेत. तर आनंद वाघ (वय 28) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बीड शहरातील एका शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता लग्न होणार होते. त्यासाठीच दोन गाड्यांमधून १० मित्र बीडला येत होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पेंडगावजवळ येताच चालकाचा कारवरील ताबा सुटला. यामुळे गाडी पलटी झाली. यात कारचा चक्काचूर झाला तर कारमध्ये अडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.

आनंद वाघ हा मागे बसलेला असल्याने त्याला कमी मार लागला. हा अपघात लोकांनी महामार्ग पोलिसांना संपर्क करून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. सध्या आनंदवर बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Three killed in a car accident while going to a friend’s wedding

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here