Home अहमदनगर अहमदनगर: डोक्यात कुऱ्हाड घालून एकाचा खून

अहमदनगर: डोक्यात कुऱ्हाड घालून एकाचा खून

Ahmednagar News:  डोक्यात कुन्हाडीने घाव घालून एका व्यक्तीचा खून (Murder),  गुन्ह्यातील तीनही आरोपी अल्पवयीन.

One was Murder by an ax to the head

पारनेर | Parner : पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे डोक्यात कुन्हाडीने घाव घालून एका व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२२) रात्री घडली. यात सुपा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे गुन्ह्यातील तीनही आरोपी अल्पवयीन आहेत. घटनेने पारनेर तालुका हादरला आहे. संतोष बबन गायकवाड (रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नारायणगव्हाण येथील गायकवाड परिवार व दरेकर परिवार यांच्यात यापूर्वीच मोठा वाद झाला होता. गुरुवारी (दि. २३) रात्री ८ ते १० वाजेदरम्यान तीन अल्पवयीन मुले संतोष गायकवाड यांच्या घराजवळ गेले. या तीनही जणांनी गायकवाड यांना कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून ठार केले.

गायकवाड परिवार व दरेकर परिवार यांच्यात काही दिवसपुर्वीच मोठा वाद झाला होता. गुरुवारी रात्री १० वाजता पुन्हा या वादाला तोंड फुटले. यात तीन जणांनी गायकवाड यास कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालुन ठार केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तत्काळ माहिती गोळा करत घटनेतील तीनही आरोपींना रात्रीच अटक केली प्राथमिक माहितीनुसार तीनही आरोपी अठरा वर्षांच्या आतील आहेत. या प्रकारामुळे नारायणगव्हाण परिसरात तणावाचे वातावरण होते. नारायणगव्हाण येथील संतोष गायकवाड यांच्या खूनप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.  जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी पुढील तपास करत

Web Title: One was Murder by an ax to the head

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here