Home Accident News अहमदनगर: दिंडीतील वारकऱ्याचा अपघाती मृत्यू

अहमदनगर: दिंडीतील वारकऱ्याचा अपघाती मृत्यू

Ahmednagar news:  वारकऱ्याचा पुणे-सोलापूर महामार्गावर मदनवाडीहद्दीत सकुंडे वस्ती येथे पहाटे पाचच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत (Accident) जागीच मृत्यू.

Accident death of a worker in Dindi

श्रीगोंदा : तालुक्यातील सुरेगाव येथील आनंदाश्रम स्वामी दिंडी सोहळ्यातील वारकरी लक्ष्मण मार्तंड रोडे (वय ७५, रा. घुटेवाडी, ता. श्रीगोंदा) या वारकऱ्याचा पुणे-सोलापूर महामार्गावर मदनवाडीहद्दीत सकुंडे वस्ती येथे गुरुवारी (दि. २२) पहाटे पाचच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.

सुरेगाव येथील श्री आनंदाश्रम स्वामी महाराजांची पायी दिंडी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला चालली आहे. ही दिंडी बुधवारी रात्रीपासून मदनवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत सकुंडे वस्तीजवळ मुक्कामी होती. गुरुवारी पहाटे दिंडीतील सदस्य असलेले लक्ष्मण रोडे हे पहाटे प्रात:विधी उरकून पुढील मार्गावर जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. यावेळी हा अपघात झाला.  या अपघातात रोडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सहा मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. याबाबत भिगवण पोलिस ठाण्यामध्ये लक्ष्मण रोडे यांचे जावई कल्याण गुलाब घुटे यांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Accident death of a worker in Dindi

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here