Home Accident News संगमनेर: टँकरने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

संगमनेर: टँकरने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

Sangamner Crime: भरधाव वेगाने टँकरने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन जागीच ठार.

tanker hit the motorcycle hard, the biker died on the spot in the accident

संगमनेर: भरधाव वेगाने टँकरने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. अपघातानंतर टँकर चालक आरोपी फरार झाला. या प्रकरणी मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत निवृत्ती गुरु गबाले हे आपल्या हिरो होंडा मोटारसायकल क्रमांक एम एच १७ बी यु ६१२५ वरुन मंगळावर २० रोजी तालुक्यातील वडगांव लांडगा फाटा येथून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या टँकर क्रमांक एम एच

१७ टी ३०६८ वरील चालक बबन नाथा दिघे रा. तळेगाव दिघे ता. संगमनेर याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत निवृत्ती गबाले यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत निवृत्ती गबाले यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. मात्र अपघात घडूनही टँकर चालक बबन दिघे हा घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान जखमी निवृत्ती गबाले यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. या प्रकरणी मयताचा मुलगा अजित निवृत्ती गबाले यांच्या फिर्यादीवरून आरोपी बबन दिघे याच्यावर गुन्हा रजी. नंबर कलम १ ३९६ / २०२३ भादवी कलम ३०४, (अ), २७९, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, (अ), (ब), १७७ प्रमाणे दाखल केला आहे.

Web Title: tanker hit the motorcycle hard, and the biker died on the spot in the accident

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here