Home क्राईम संगमनेर शहर पोलिस वसाहतीच्या रूममधून चोरी, चोरट्यांचे धाडस वाढले

संगमनेर शहर पोलिस वसाहतीच्या रूममधून चोरी, चोरट्यांचे धाडस वाढले

Sangamner Theft:  चोरट्यांनी थेट गजबजलेल्या पोलिस वसाहतील असलेल्या रूममधूनच चक्क दोन दुचाकी चोरून पोलिसांनाच आव्हान दिल्याची घटना.

Theft from the Room of the city police colony, the courage of the Thieves 

संगमनेर: संगमनेर शहरात दररोज दुचाकी चोरीच्या घटना घडत असुन चोरी गेलेल्या मोटर सायकल व चोरांचा अजूनपर्यंत तपास लागलेला नाही तोच आता तर चोरट्यांनी थेट गजबजलेल्या पोलिस वसाहतील असलेल्या रूममधूनच चक्क दोन दुचाकी चोरून पोलिसांनाच आव्हान दिल्याची घटना गुरुवार ( ता.२२) जून रोजी दुपारी घडली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पोलिस वसाहतीच्या रूममध्ये बुलेट क्रमांक( एमएच २० ए.९४२३, (एमएच १७ सीए.९८६०) या दोन दुचाकी लावल्या होत्या अज्ञात चोरट्यांनी शासकीय रखवालीतून या दोन्ही दुचाकी चोरून पसार झाले आहे. याप्रकरणी महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिता गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महाले हे करत आहे.

दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शहरातील विविध भागात मोठ्याप्रमाणात दुचाकीच्या दररोज चोऱ्या होत आहे.त्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत.आता तर चोरट्यांनी थेट पोलिस वसाहतीच्या रूममधूनच दुचाकी चोरून पोबारा केल्याने आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: Theft from the Room of the city police colony, the courage of the Thieves 

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here