पोलिसांची सेक्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३ अभिनेत्रींची सुटका
पिंपरी चिंचवड | Pune Sex Racket: पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करत वाकड परिसरातील मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यावेळी छत्तीसगढी गाण्यांचे अल्बम आणि स्टेज शोमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री व इतर दोन मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. स्वतः च्या वैयक्तिक फायद्यासाठी वाकड परिसरात अभिनेत्रींकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दलालांवरही कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी सापळा रचत बनावट ग्राहक बनवून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असून पोलिसांनी पाच गुन्हेगारांना अटक केली आहे.
जितेंद्र हस्तीमल बोकडीया, हेमंत साहू, मुकेश केसवाणी, करण, युसुफ शेख आणि त्यांच्या काही साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित अभिनेत्रींपैकी एक महिला छत्तीसगडची आहे तर उर्वरित दोन महिला राजस्थान आणि मुंबईच्या आहेत. या सर्व महिला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी छत्तीसगढी गाण्यांच्या अल्बम आणि स्टेज शोमध्ये काम करत होत्या. मात्र आरोपीने जास्त पैशांचं आमिष दाखवत त्यांना वेश्या व्यवसायात आणले. आरोपींच्या ताब्यातून दहा हजार रुपयांची रोकड, जवळपास नऊ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत.
Web Title: Pune Police crackdown on sex racket