Home अहमदनगर अहमदनगर: नदीच्या नाल्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ

अहमदनगर: नदीच्या नाल्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ

finding dead body in river channel

अहमदनगर  | Ahmednagar:  नालेगाव परिसरात असणाऱ्या  सीना नदीच्या नाल्यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह (Dead body) आढळून आला. या घटनेने  एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान कोतवाली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर  त्या व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहे.

या मृतदेहाचे  अंदाजे वय 35 ते 40 वर्षे असलेला पुरूषाचा मृतदेह आढळून आला. याबाबत  स्थानिकांनी कोतवाली पोलिसांना माहिती  दिली. अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर उपअधीक्षक अनिल कातकडे, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

वाचा: Ahmednagar News

या मृतदेहाच्या अंगावर पांढरे कपडे व जिन्स पॅन्ट असून त्याचे अंदाजे वय 35 ते 40 वर्ष आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

Web Title: finding dead body in river channel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here