Home अहमदनगर तोतया पोलीस बनून महिलेला जाळ्यात ओढत लैंगिक अत्याचार

तोतया पोलीस बनून महिलेला जाळ्यात ओढत लैंगिक अत्याचार

Rahata puppet policeman and sexually abusing a woman

राहता | Rahata: इन्स्टाग्राम या सोशियाल माध्यमातून पोलीस भरतीत मदत करण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाच्या विरोधात पिडीतेने राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आरोपी किरण महादेव शिंदे रा. हिवाराफोडी, बीड याला पोलिसांनी अटक केली आहे.

शिर्डी येथील महिलेशी सोशियाल माध्यमातून ओळख निर्माण केली. या माध्यमातून महिलेशी मैत्री केली. बनावट आयकार्ड व फोटो टाकून शिर्डी पोलीस ठाण्यात पोलीस असल्याचे भासविण्यात आले आणि जवळीक संबंध तयार केले. तुला पोलीस भरतीत मदत करतो, तू नवऱ्याला सोडून माझ्याशी लग्न कर असे सांगत महिलेशी शारीरिक संबंध ठेवले.

या पिडीत महिलेला तोतया पोलीस असल्याचा संशय आल्याने विचारणा केलीं असता आरोपीने महिलेस मारहाण केली. त्यानंतर पिडीत महिलेने राहता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे पोलिसाचे बनावट आयकार्ड, पोलीस ड्रेस, फोटो सापडले. याप्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडोरे हे करीत आहे.

Web Title: Rahata puppet policeman and sexually abusing a woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here