Home अहमदनगर Theft: नोकरानेच लांबविले अडीच लाख रुपये

Theft: नोकरानेच लांबविले अडीच लाख रुपये

Theft servant took away two and a half lakh rupees

अहमदनगर: घर नोकराच्या हवाली करून लग्नाला गेलेल्या व्यापाऱ्याचे अडीच लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. नगर शहरातील भराड गल्ली येथे घडली.

याबाबत हर्शल नरेंद्र शेकटकर वय ३२ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, हर्शल हे कुटुंबासह  २१ ते २८ फेब्रुवारी दरम्यान लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांच्याकडे कामास  असलेली कल्पना गवळी रा. तोफखाना ही नियमित घरी कामाला येत होती.

दरम्यान बाहेरगावाहून आल्यानंतर १ मार्च रोजी हर्शल यांनी व्यापाऱ्याचे पैसे देण्यासाठी कपाट उघडले असता त्यामधून अडीच लाख रुपये चोरी झाल्याचे लक्षात आले. ही चोरी कल्पना गवळी हिनेच केली असल्याचा संशयावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Theft servant took away two and a half lakh rupees

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here