Home Accident News Accident: सफरचंद घेऊन जाणारा ट्रक रस्त्यावर उलटला, सफरचंदाचा सडा

Accident: सफरचंद घेऊन जाणारा ट्रक रस्त्यावर उलटला, सफरचंदाचा सडा

Rahuri Accident truck carrying apples overturned on the road

Ahmednagar News | Rahuri Accident | राहुरी: राहुरी खुर्दमध्ये नगर-मनमाड राज्य महामार्गावर मुळा नदीपुलाजवळ सफरचंदाचा ट्रक पलटी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात मोठ्या प्रमाणात वाहतूक चक्काजाम झाली होती. त्यामधे ट्रकचे व सफरचंदाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महामार्गावर मोठ्या प्रमाणात सफरचंदाचा सडा पडला.

या घटनेने  वाहतूक सुरळीत न झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. दरम्यान दोन्हीही बाजूने सुमारे पाच किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आज (शुक्रवार) सकाळी राहुरीकडून नगरच्या दिशेने चाललेला सफरचंदाचा ट्रक राहुरी खुर्द येथील मुळा नदीच्या पुलाजवळ रस्ता दूभाजकावर आदळुन हा ट्रक पलटी झाला.त्यामधे ट्रकचे व सफरचंदाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महामार्गावर मोठ्या प्रमाणात सफरचंदाचा सडा पडल्याने अनेक नागरीकांनी सफरचंदावर ताव मारला. रस्त्यावरच हा अपघात झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा पाच-सहा किलोमिटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहोचले होते.

Web Title: Rahuri Accident truck carrying apples overturned on the road

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here