Home अहमदनगर Crime: ३० वर्षीय इसमाने घरात घुसून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

Crime: ३० वर्षीय इसमाने घरात घुसून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

Shrigonda crime broke into the house and had an affair with a 13-year-old girl

Ahmednagar News | Shrigonda  Crime | श्रीगोंदा: तालुक्यातील एका गावात एका ३० वर्षीय इसमाने घरात घुसून 13  वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पीडित मुलीची आई मजुरी करण्यासाठी शेतात गेली असता पीडित मुलगी घरात एकटीच होती. दरम्यान सायंकाळी ५ ते ६ चे दरम्यान रोहिदास इधाटे (रा.बेलवंडी बुद्रुक) हा इसम मोटारसायकलवर पीडित मुलीच्या घरासमोर येऊन थांबला व तिला माझा मित्र या भागात कुठे राहतो असे विचारले. यावर तिने मला माहित नाही असे म्हणत घराचा दरवाजा बंद केला.त्यानंतर रोहिदास हा फोनवर बोलत तिथेच उभा राहून पीडितेला आवाज दिल्याने तिने अर्धा दरवाजा उघडताच त्याने दरवाजा पूर्ण ताकतीने लोटून घरात प्रवेश केला. दरवाजा बंद करत पीडित मुलीबरोबर अश्लील चाळे करू लागल्याने पीडित मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून पीडित मुलीचे चुलते ही पळत येऊ लागले हे इधाटे याने खिडकीतून पाहिले आणि खिडकीतून उडी मारून आपल्या मोटारसायकलवरून पळून गेला. पीडित मुलीचे आई वडील घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार तिने सांगितला. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली.

Web Title: Shrigonda crime broke into the house and had an affair with a 13-year-old girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here