Home Suicide News एका महाविद्यालयातील कर्मचाऱ्याची रेल्वे रुळावर आत्महत्या

एका महाविद्यालयातील कर्मचाऱ्याची रेल्वे रुळावर आत्महत्या

Ahmednagar college employee commits suicide on a railway track

Ahmednagar News Live | Suicide | अहमदनगर: रेल्वे रुळावर एका ५६ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. रामदास निवृत्ती साबळे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि,  मयत साबळे हे नगर तालुक्यातील वाटेफळ येथील रहिवाशी आहेत. नगर शहरातील एका महाविद्यालयात ते नोकरीस होते. साबळे हे कुटुंबासह वाटेफळ येथे वास्तव्यास आहेत.

गुरूवारी सकाळी कामावर जात असल्याचे सांगून ते नगरमध्ये आले होते. मात्र सकाळी अकरा वाजेच्या सुमारास  त्यांनी नगर कल्याण रोडवरील रेल्वे पुलाच्या उजव्या बाजुला आत्महत्या (Suicide) केली. साबळे यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे समजू शकले नाही.

सदर घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर साबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला.

Web Title: Ahmednagar college employee commits suicide on a railway track

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here