Home महाराष्ट्र Corona Breaking: महाराष्ट्रात कोरोनाने घेतले विस्फोटक रूप

Corona Breaking: महाराष्ट्रात कोरोनाने घेतले विस्फोटक रूप

Corona Breaking Corona takes explosive form in Maharashtra

मुंबई | Corona Breaking: महाराष्ट्र राज्यासाठी चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाने विस्फोटक रुप धारण केले आहे. राज्यात एकाच दिवशी 8 हजार 67 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अडीच महिन्यानंतर एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत रेकोर्ड ब्रेक रुग्ण आढळून येत आहे. एकाच दिवसात 5428 रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे.

मुंबई सोबत पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात आज तब्बल 412 नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. लवकरच राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील सध्याची उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या  1 हजार 799 वर पोहोचली आहे.

पुणे शहर अपडेट :

आज दिवसभरात पुणे शहरात 412 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर, दिवसभरात रुग्णांना 95 डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पुणे शहरात कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसला तरी पुण्याबाहेरील एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 92 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – 510218

पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 1799

एकूण मृत्यू – 03

आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 499303

नागपूर अपडेट :

नागपूरात एकाच दिवशी 90 नवे कोरोना पॉझिटिव्ह

शहरात 81 तर ग्रामीण मध्ये 9 रुग्ण

रुग्णसंखेत वाढ होत असल्याने नागपूरकरांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

Web Title: Corona Breaking Corona takes explosive form in Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here