Home अहमदनगर Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Rahuri Accident Woman killed in unidentified vehicle crash

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील गुहा बसस्थानकाजवळ नगर- मनमाड हायवेवर आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एका अंडे वाहतूक करणार्‍या पिकअपने एका शेतमजूर महिलेस जोराची धडक दिल्याने अपघात (Accident) घडला. या अपघातात ती जागीच ठार झाली. सध्या नगर-मनमाड हायवेचे काम सुरू असल्यामुळे गुहा पासून एकेरी वाहतूक सुरू आहे.

वंदना विलास सौदागर असे या अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. वंदना सौदागर ही महिला गुहा गावात आठवडे बाजार असल्यामुळे बाजारातून ज्वारी खरेदी करून रोड पास करत असताना अंडे वाहतूक करणारा पिकअपने भरधाव वेगात येऊन महिलेस रोड क्रॉस करत असताना जोराची धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली आहे. पिकअप ओव्हर टेकिंग करत असताना हा अपघात झाला. पिकअप चालक हायगाईने गाडी चालवत घटनास्थळावरून पसार झाला. सआलेदर महिलेस रुग्णालयात हलविण्यात आले मात्र मयत घोषित करण्यात आले.

Web Title: Rahuri Accident Woman killed in unidentified vehicle crash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here