Home अकोले अकोलेतील घटना: फुकट्या शब्द जिव्हारी लागला अन भावानेच घेतला भावाचा जीव

अकोलेतील घटना: फुकट्या शब्द जिव्हारी लागला अन भावानेच घेतला भावाचा जीव

Akole Murder  became a jewel and the brother took his brother's life

Akole Murder | अकोले: अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिल मयत झाल्यानंतर आईला कोणी संभाळायचे? या कारणाहुन दोन भावांत वाद सुरु होते. यातील एकाने आठ महिन्यापुर्वी आईच्या गळ्यातील लक्ष्मीहार एका ठिकाणी गहाण ठेवला होता. त्याबाबत त्याला टोकले असता त्याने थेट आपल्या भावावर कुर्‍हाडीने वार केले. एकदा नव्हे तर दोनदा हल्ला झाल्यानंतर भाऊ रक्तभंबाळ झाला आणि अखेर त्याने जीव सोडला. अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे शुक्रवार दि. 11 मार्च 2022 रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

रविंद्र मनोहर आरोटे (वय 51) यांचा मृत्यु झाला आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नीने थेट अकोले पोलीस ठाण्यात धाव घेत  पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांना घटना कथन केली.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर मार्तंड मनोहर आरोटे, मयुर मार्तंड आरोटे, शकुंतला मार्तंण्ड आरोटे, सोनल मयुर आरोटे (सर्व रा. ब्राम्हणवाडा, ता. अकोले) या चौघांना आरोपी करण्यात आले आहे.

तुझ्या भावाने माझा सोन्याचा लक्ष्मीहार कोठेतरी गहाण ठेवला आहे. त्यावर रविंद्र म्हणाले की,  देताना तु मला विचारले होते का? तो फुकट्याच आहे. तो कसला परत देतो आता. हे शब्द मार्तंण्ड याने ऐकले असता तो धावत धावत पुढे आला आणि त्याच्या हातातील कुर्‍हाड आपल्या भावाच्या डोक्यात घातली.

जेव्हा रविंद्र हे जमिनीवर कोसळले तेव्हा यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर रविंद्र यांच्या पत्नीने मोठ्या धिराने आपल्या नातेवाईकांना फोन केला. तेव्हा एक व्यक्ती तत्काळ आला असता त्यांनी रविंद्र यांना त्यांच्या रिक्षात टाकून ब्राम्हणवाडा येथील सरकारी दवाखान्यात आणले

मात्र, त्यांची प्रकृती प्रचंड गंभीर असल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णवाहीकेतून आळेफाटा येथे हलविण्यात आले. तोपर्यंत ते बेशुद्ध पडले होते. रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्या डोक्याचे सिटीस्कॅन करुन उपचार सुरू केले मात्र फार उशीर झाला होता.  अंतर्गत रक्तस्त्राव आणि मेंदुला लागलेला मार यामुळे ते स्वत:ला सावरु शकले नाही. त्यांनी त्याच दिवशी रात्री एक वाजेच्या सुमारास जीव सोडला.

त्यानंतर पत्नी ललीता रविंद्र आरोटे (रा. खंडोबाची वाडी, रा. ब्राम्हणवाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात उपरोक्त व्यक्तींवर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Akole Murder  became a jewel and the brother took his brother’s life

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here