Home क्राईम Rape Case: जामीनावर सुटका झाल्यानंतरही पुन्हा तिच्यावरचं बलात्कार

Rape Case: जामीनावर सुटका झाल्यानंतरही पुन्हा तिच्यावरचं बलात्कार

Accused sentenced to 10 years for rape minor girl

Rape Case | बीड : जामीनावर बाहेर सोडल्यादेखील अल्पवयीन मुलीवर आरोपीने अत्याचार (sexually assault) केला असल्याची धक्कादायक घटना घडली असल्याचे तपासातून समोर आले आहे. केज तालुक्यातील साबळा या गावात ही घटना घडली आहे., अशोक सरवदे असे आरोपीचे नाव आहे. अशोक सरवदे हा विवाहित देखील आहे. त्याला दोन मुले आहेत. अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेणाऱ्या अशोकच्या विरोधात  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्याला अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर न्यायालयाने त्याला जामीनावर बाहेर सोडल्यानंतर या आरोपीने त्याचं अल्पवयीन पीडित मुलीला पुन्हा फूस लावून पळवून नेले होते. नेले आणि अल्पवयीन असतानादेखील तिच्यावर वारंवार अत्याचार केला. आरोपी हा काही दिवस या अल्पवयीन मुलीसोबत बायकोसारखा राहात असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार (rape) करणाऱ्या आरोपीला दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.

दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी या आरोपीच्या विरोधात केज पोलीस ठाण्यामध्ये गुरनं ४०५/ २०२० कलम ३६३, ३६७ (जे) (एन) भादवी सह कलम ४६८, १०, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर फिर्यादीवरून २८ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंद करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले.

सदर प्रकरणात साक्षीदारांची साक्ष पुरावे आणि वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली असून,  सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले.

Web Title: Accused sentenced to 10 years for rape minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here