Home अहमदनगर राहुरी: आप्पासाहेब ढुस यांची बदनामी केल्याबद्दल रजनी शेट्टी यांचा राहुरीत निषेध…बदनामीचा गुन्हा...

राहुरी: आप्पासाहेब ढुस यांची बदनामी केल्याबद्दल रजनी शेट्टी यांचा राहुरीत निषेध…बदनामीचा गुन्हा दाखल.

राहुरी: आप्पासाहेब ढुस यांची बदनामी केल्याबद्दल रजनी शेट्टी यांचा राहुरीत निषेध…बदनामीचा गुन्हा दाखल.

अंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस हे त्यांचे फेसबुक पेजवर अतिरंजित पोस्ट टाकून महाराष्ट्र शासन व इतरांची फसवणूक करीत असल्याबद्दल भिंगार येथील श्रीमती रजनी राजू सत्यनारायण (शेट्टी) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे तक्रार देउन ढुस हे शासनाची फसवणूक करत असले बद्दल निवेदन देऊन त्यास प्रसार प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी दिलेने ढुस यांची बदनामी झाली म्हणून राहुरी तालुक्यातील क्रांती सेनेच्या वतीने तीव्र शब्दात रजनी शेट्टी यांचा  निषेध नोंदविला. 
      क्रांती सेना पदाधिकारी यांनी राहुरीच्या  तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती अत्यंत मेहनतीने आपल्या देशासाठी सुवर्णपदक मिळविते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करते. अशा खेळाडूला समाजाने प्रेरणा देण्याऐवजी त्यांच्यावर बिनबुडाचे खोटे आरोप करून त्यांची बदनामी करणे ही खूपच लाजिरवाणी व निषेधार्थ घटना आहे. 
      हवेतील साहसी खेळांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे भूषण असलेले तसेच हवेतील साहसी क्रीडा प्रकारात महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वोच्च साहसी खेळाडू म्हणून शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार देऊन ज्यांचा गौरव केला आहे. ज्यांच्या नावावर तीन राष्ट्रीय विक्रमांची नोंद आहे व आता महाराष्ट्र शासनाने ज्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस केली आहे. असे देवळाली प्रवरा येथील प्रथम भारतीय सुवर्ण पदक विजेते आंतराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे बद्दल जनतेची दिशाभूल करणाऱ्या तक्रारदाराचा आम्ही जाहीर निषेध करतो. तक्रारदाराच्या अशा या फालतू  तक्रारीमुळे खेळाडूंचे मनोधैर्य खच्चीकरण होत असून तालुक्यातील खेळाडूंचे त्यामुळे भवितव्य धोक्यात येणार आहे.  म्हणून आम्ही ढुस यांची बदनामी सहन करणार नाही. तालुक्यासह जिल्ह्याच्या राज्याच्या व देशाच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून कित्येक वर्षापासून अहोरात्र मेहनत घेत असलेल्या आप्पासाहेब ढुस यांची बदनामी करणाऱ्यांची तात्काळ चौकशी करावी व त्यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल करावा. आणि त्यांना तात्काळ अटक करावी.अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
      राहुरी पोलिसांनी या सर्वपक्षीय निवेदनांची तात्काळ दखल घेऊन आप्पासाहेब ढुस यांची बदनामी केली म्हणून अहमदनगरच्या भिंगार येथील श्रीमती रजनी राजू सत्यनारायण शेट्टी यांचेवर भा. द. वि. 1860 चे कलम 500 अन्वये  बदनामीचा गुन्हा दाखल केला आहे.
      राहुरीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.या घटनेचा क्रांती सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, कार्याध्यक्ष संदीप ओहळ, जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेंडगे,शिलेगाव ग्रांमपंचायतचे माजी सरपंच रमेश म्हसे पाटील, तालुका अध्यक्ष संदिप उंडे,युवक जिल्हाध्यक्ष शेखर पवार, शहराध्यक्ष संतोष मेहत्रे, बाळासाहेब पवार, गोपीनाथ लांबे आदींनी निषेध केला.

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here