Home सिन्नर सिन्नर: मनेगाव येथे कृषी माहिती केंद्राचे उद्धघाटन

सिन्नर: मनेगाव येथे कृषी माहिती केंद्राचे उद्धघाटन

मनेगाव येथे कृषी माहिती केंद्राचे उद्धघाटन

 सिन्नर (प्रतिनिधी) – सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी आलेल्या श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड येथील कृषीदूतांनी  गावातील शेतकऱ्यांची अडचण जाणून घेण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीतील  नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी माहिती केंद्र सुरू केले . त्याचे उद्धघाटन गावाचे सरपंच  अॅड. सुहास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच कडलग, ग्रामसेवक, वन रक्षक व मनेगाव ग्रामस्थ आदी उपस्थित होते. शेतकरी माहिती केंद्रामध्ये फळउत्पादन, पिकांवरील कीड अन् रोग व्यवस्थापन , काढणी नंतरचे तंत्रज्ञान , कृषी विषयक पुस्तके, प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव इ. उपलब्ध आहे .शेतकरी बांधवांना त्यांच्या समस्यांच्या निरसन करण्यासाठी हे माहिती केंद्र फायदेशीर ठरणार आहे.
 ‎         कृषीदुतांना प्राचार्य डॉ. हारदे सर ,प्रा. दसपुते सर , प्रा. घुले मॅडम , प्रा. राऊत मॅडम, प्रा. तायडे सर , प्रा . माने सर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमासाठी कृषिदुत विशाल गव्हाणे, सागर गाजरे, वैभव मोरे , सिद्धांत मनतोडे, पांडुरंग लंके ,स्वप्नील लंके यांनी विशेष परिश्रम घेतले.

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here