Home Ahmednagar Live News Crime: तब्बल आठ जणांकडून तरुणास बेदम मारहाण

Crime: तब्बल आठ जणांकडून तरुणास बेदम मारहाण

Rahuri Crime Young man beaten to death by eight persons

Ahmednagar news live | Rahuri Crime| राहुरी:  राहुरी तालुक्यातील मुसळवाडी शिवारात शेतजमीन परस्पर नावावर करून घेतल्याच्या रागातून पंकज राजुळे या तरूणाला आठ जणांच्या टोळक्याने लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना दि. 28 डिसेंबर रोजी घडली.

याबाबत पंकज गोरक्षनाथ राजूळे (वय 23 वर्षे, रा. टाकळीमिया, ता. राहुरी) याने फिर्याद दाखल केली आहे. पंकज राजुळे याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात आरोपी कचरू लक्ष्मण माळवदे, सतीश बाबासाहेब माळवदे, अण्णासाहेब लक्ष्मण माळवदे, पोपट कचरू माळवदे, सविता अण्णासाहेब माळवदे, दादासाहेब कचरू माळवदे, योगिता दादासाहेब माळवदे, हर्षल अण्णासाहेब माळवदे सर्व राहणार मुसळवाडी ता. राहुरी या आठजणांवर मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी पंकज  दुपारी तीन हा मुसळवाडी शिवारातील त्याच्या शेतात होता. त्यावेळी आरोपी पंकज राजुळे याच्या शेतात गेले. ते राजुळे याला म्हणाले, तू शेतजमीन आमच्या परस्पर नावावर करून का घेतली? या चा राग मनात धरून आरोपींनी पंकज राजुळे याला लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण करून जखमी केले.या मारहाणीत पंकज राजुळे याच्या खिशातील मोबाईल व पैसे गहाळ झाले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार प्रभाकर शिरसाठ हे करीत आहेत.

Web Title: Rahuri Crime Young man beaten to death by eight persons

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here