Home अहमदनगर शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यु

शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यु

Rahuri Schoolboy drowns in pond

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला शाळकरी मुलाचा वांबोरी येथील मळगंगा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वांबोरी येथील एका माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकणारा आदित्य सुनील कुसमुडे वय १३ हा शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसमवेत वांबोरी येथील मळगंगा तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना पाण्यात गाळ असल्याने त्याला पाणी आणि गाळाचा अंदाज न आल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तलावात मुलगा बुडाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.

बुडालेल्या मुलाला वाचविण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तीन तास शोध घेतल्यानंतर आदित्यचा शोध लागला. त्याला बाहेर काढल्यावर तत्काळ वांबोरी ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी अंजली मंडलिक यांनी मृत घोषित केले.  

Web Title: Rahuri Schoolboy drowns in pond

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here