Home क्राईम संगमनेरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

संगमनेरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Sangamner preparing for the robbery smiled at the police

संगमनेर: दरोड्याच्या (robbery) तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांपैकी तिघा दरोडेखोरांना पाठलाग करून पकडण्याची कामगिरी संगमनेर शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने केली आहे. मात्र यातील तिघे जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.

समनापूर बाह्यवळण ते पुणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. पळून गेलेया एकाला शनिवारी दुपारी पकडण्यात आले आहे.

विक्रम रामनाथ घोडेकर वय २०, अजित अरुण ठोसर वय २० दोघे पंपिंग स्टेशन कसारा दुमाला रस्ता संगमनेर, सर्फराज राजू शेख वय १९ अकोले नाका संगमनेर, कलीम अकबर पठाण हलीम अकबर पठाण, असिफ शेख रा. जमजम कॉलनी संगमनेर असे सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामधील कलीम पठाण व असिफ शेख हे फरार आहेत. तर हलीम पठाण याला शनिवारी दुपारी पकडण्यात आले.

हलीम पठाण हा एका भंगारच्या दुकानात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याने तेथून पळ काढला, पोलिसांनी पाठलाग करीत समानापूर येथील गणपती मंदिरासमोर पकडण्यात आले.

त्यांच्याकडे असणारे वाहने, तीन कोयते, एक गिलोर असा ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Sangamner preparing for the robbery smiled at the police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here