Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात खळबळ: लॉजच्या रूममध्ये महिलेची आत्महत्या

अहमदनगर जिल्ह्यात खळबळ: लॉजच्या रूममध्ये महिलेची आत्महत्या

Rahuri Woman commits suicide in lodge room

Ahmednagar | Rahuri | राहुरी: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी  शहरातील हॉटेल न्यू भरत येथे एका रूम मध्ये तरूण महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. अनिता राजू कणसे (वय 31 रा. पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काल पासून हॉटेल न्यू भरत येथे ही महिला रूम घेऊन राहत होती. रूमची सफाई करायची असल्याने महिलेला आवाज देण्यात आला. मात्र, रूम मधून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल मालकास बोलावण्यात आले. खिडकीतून डोकावलं असता तिचा मृतदेह  पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

वाचा: Ahmednagar News

याबाबत राहुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. या महिलेने आत्महत्या केली आहे कि तिची हत्या झाली आहे याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नसून अधिक तपास राहुरी पोलीस करत आहेत.

Web Title: Rahuri Woman commits suicide in lodge room

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here