Home क्राईम बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना: अत्याचार करून लुटले

बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना: अत्याचार करून लुटले

Rape Case Brother tortured his sister by showing her the lure of marriage

औरंगाबाद | Aurangabad Crime: औरंगाबाद येथे बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. भावानेच बहिणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार (Rape) करून दागिने लुटल्याची फिर्याद महिलेने पोलिसांत दिली असून दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे मावस बहीण भाऊ आहेत. फिर्यादी पिडीत महिलेचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झालेला आहे.

या महिलेच्या मावस भावाने तुझ्याशी लग्न करेन, आयुष्यभर तुझ्या मुलीचा सांभाळ करेल, असे सांगून लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या आई-वडिलांचा विश्वास संपादन केला.

मावसभाऊ याने फिर्यादीचे आणि फिर्यादीच्या आईचे दागिने वेळोवेळी मोडून 5 लाख रुपये घेऊन जुलै 2021 ते डिसेंबर 2021 या काळात त्याच्या भोईवाडा येथील रूमवर तसेच समर्थ नगर येथील एका हॉटेलमध्ये नेत फिर्यादी महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान ऑक्टोंबर 2021 मध्ये फिर्यादी महिलेस गर्भधारणा (Pregnant) झाली.

त्यावेळेस आरोपीने लग्न होईपर्यंत गर्भधारणा करू नकोस म्हणून गोळ्या घेऊन गर्भपात केला. त्यानंतर तू जर हे कोणाला सांगितले तर तुझ्या मुलीला जीवे मारेल आणि तुझ्या सोबत लग्न करणार नाही. अशी धमकी देऊन लग्न करण्यास टाळाटाळ करीत असे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यातील आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Rape Case Brother tortured his sister by showing her the lure of marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here