Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग! नावाला कॅफे, जोडप्यांना बसण्यासाठी अड्डा !

अहमदनगर ब्रेकिंग! नावाला कॅफे, जोडप्यांना बसण्यासाठी अड्डा !

Breaking News | Ahmednagar:  कॅफे चालविण्याचा कोणताही परवाना नसताना छोटे-छोटे कम्पार्टमेंट तयार करून पडदे लावून मुला मुलींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली.

Raid on Cafe, a hangout for couples

अहमदनगर: नगर- मनमाड रोडवरील डौलै हॉस्पिटल परिसरात असलेल्या स्टेला कॅफेवर छापा टाकत तोफखाना पोलिसांनी साहित्य जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि. १) करण्यात आली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फरहान सरफराज शेख (वय २७, रा. केडगाव, नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर- मनमाड रोडवरील कॅफे चालविण्याचा कोणताही परवाना नसताना छोटे-छोटे कम्पार्टमेंट तयार करून पडदे लावून मुला मुलींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती.

विशेष म्हणजे कॅफे नाव असून, कॉफीही उपलब्ध नव्हती. तसेच कोणतेही खाद्यपदार्थ नसल्याचे पोलिस कारवाईतून समोर आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

Web Title: Raid on Cafe, a hangout for couples

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here