Home अहमदनगर अहमदनगर: प्रेमविवाह केल्याने मुलीला जात पंचायतीत मारहाण

अहमदनगर: प्रेमविवाह केल्याने मुलीला जात पंचायतीत मारहाण

Breaking News | Ahmednagar: जात पंचायतीमध्ये न्यायनिवाडा करताना प्रेमविवाह केलेल्या एका मुलीला पंचांनीच मारहाण केल्याची घटना.

Girl beaten in caste panchayat for love marriage

पाथर्डी : जात पंचायतीला कायद्याने बंदी असतानाही तालुक्यातील मढी (ता. पाथर्डी) येथे एका समाजाने जातपंचायत भरविली. या जात पंचायतीमध्ये न्यायनिवाडा करताना प्रेमविवाह केलेल्या एका मुलीला पंचांनीच मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.१) घडली. या घटनेत मारहाण झालेल्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकूण सहा जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी युवती कान्हेश्वरी लक्ष्मण दासरजोगी (वय २०, रा. निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर) हिने प्रेमविवाह केला आहे. या प्रेमविवाहावर निवाडा करण्यासाठी मढी येथे जातपंचायतीचे आयोजन केले होते. या जातपंचायतीमध्ये फिर्यादी मुलीचे वडील लक्ष्मण व आई चंदा, भाऊ सुमित दासरजोगी हे उपस्थित होते. पंच म्हणून जात पंचायत प्रमुख चंदर बापू दासरजोगी, लक्ष्मण चंदर दासरजोगी, तात्या चंदर दासरजोगी,  ताया मल्लू दासरजोगी, रोहित ताया दासरजोगी, काशीनाथ अंबादास दासरजोगी (सर्व, रा. निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर) उपस्थित होते.

यावेळी सर्व पंचांनी मुलीच्या आई-वडिलांना तुमच्या मुलीने जो प्रेमविवाह केला आहे तो आपल्या समाजाला मान्य नसून तुम्ही तो मोडून टाका.

आपण या मुलीचा दुसरा विवाह लावून देऊ, असे सांगितले. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीने जो प्रेमविवाह केलेला आहे, तो मुलगा चांगला आहे. त्यामुळे दुसरीकडे लग्न कशाला करायचे, असे पंचांना सांगितले. त्यानंतर पंच लक्ष्मण चंदर दासरजोगी व इतरांनी लक्ष्मण यांना काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच पीडित मुलगी कान्हेश्वरी, तिची आई चंदा यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जर तुम्ही आमचे सांगितलेले ऐकले नाही, तर एका एकाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Girl beaten in caste panchayat for love marriage

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here