Home अहमदनगर अहमदनगर:  हुक्का पार्लरवर छापा- Raid

अहमदनगर:  हुक्का पार्लरवर छापा- Raid

Breaking News | Ahmednagar: नगर-कल्याण रस्त्यावरील हॉटेलजवळ सुरू असलेल्या हुक्कापार्लर व हॉटेलवर छापा (Raid) घालून पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने हुक्कापार्लरसाठी वापरले जाणारे तंबाखूजन्य पदार्थ व देशी-विदेशी जप्त.

Raid on Hookah Parlor

नगर : नगर-कल्याण रस्त्यावरील हॉटेलजवळ सुरू असलेल्या हुक्कापार्लर व हॉटेलवर छापा घालून पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने हुक्कापार्लरसाठी वापरले जाणारे तंबाखूजन्य पदार्थ व देशी-विदेशी जप्त केली. त्यात सुमारे सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तम दिलीप बिस्वास (वय ३५, रा. सावेडी नाका), सौरभ किरण राणा (वय २३, रा. डौले हॉस्पिटल मागे, सावेडी) अशी आरोपींची नावे पोलीस ठाणे हद्दीतील कल्याण रोडवरील हॉटेल दीपाली येथे अवैध हुक्कापार्लर व देशी- विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस पथकाने छापा घालून १५ हजार ९६५ रुपयांची देशी-विदेशी दारू व तंबाखू जन्य पदार्थ जप्त केले. पोलिस नाईक हेमंत खंडागळे यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई

पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक शिंदे, हेडकॉन्स्टेबल सुपेकर, ओव्हाळ, मगर, पोलिस कॉन्स्टेबल द्वारके यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on Hookah Parlor

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here