Home क्राईम कुंटणखाना चालवणाऱ्या लॉजवर धाड,  मैनेजरसह तिघांवर गुन्हा

कुंटणखाना चालवणाऱ्या लॉजवर धाड,  मैनेजरसह तिघांवर गुन्हा

Solapur Crime News: सूर्या लॉज येथे वेश्या व्यवसाय (Prostitution Business) सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी लॉजवर बनावट ग्राहक पाठवून खात्री झाल्यानंतर छापा टाकला.

Raid on lodge running Prostitution Business, 3 including manager 

 

सोलापूर: विजापूररोड वरील सूर्या लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलीसांनी लॉजवर धाड टाकत तिघांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शमा इब्राहिम शेख (वय ४३, रा. राजीव नगर, शांती नगर देवराज शाळेजवळ), सागर आनंद पाटील (वय २२, रा. टाकळी), विश्वनाथ बसवराज मठपती (वय ३९, रा. निलम नगर) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आरोपी हे ग्राहकांकडून अडीच हजार रुपये घेऊन पीडितेला पाचशे रुपये देत असल्याची माहिती पोलिसांना दिली.

विजापूर रोडवरील सूर्या लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी लॉजवर बनावट ग्राहक पाठवून खात्री झाल्यानंतर छापा टाकला. यात एका पीडितेची सुटका करण्यात आली तर शमा शेख, सागर पाटील, विश्वनाथ मठपती या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव बंडगर, अकिला नदाफ, रमादेवी भुजबळ, राजेंद्र बंडगर आदींनी केली.

Web Title: Raid on lodge running Prostitution Business, 3 including manager 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here