Home अकोले अकोले हादरलं! आईसह दोन मुलींची आत्महत्या

अकोले हादरलं! आईसह दोन मुलींची आत्महत्या

Ahmednagar Akole News: मन्याळे गावात ही धक्कादायक घटना. आईसह दोन मुलींची आत्महत्या (Suicide).

Akole Breaking Suicide of two girls with mother

अकोले: अकोले तालुक्यातील मन्ह्याळे येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. आईसह दोन मुलींनी केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली असून अकोले हादरलं आहे. तिघीच्या आत्महत्येमुळे मन्याळे गावावर शोककळा पसरली आहे.

सुनिता जाधव (वय 48), प्राजक्ता जाधव (वय 22) आणि शितल जाधव ( वय 18) अशी मृतांची नावे आहेत. या  प्रकारामुळे गावात शोककळा पसरली असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील मन्याळे गावात ही दुर्देवी घटना घडली. मुलींची आई सुनिता जाधव यांनी गळफास घेत आत्महत्या केली. तर, त्यांच्या मुली प्राजक्ता जाधव आणि शितल जाधव या दोघींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आईने आत्महत्या केल्यानंतर मुलीनी देखील आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या तिघींचेही मृतदेह सध्या अकोले ग्रामीण रुग्णालयात आहेत. पोलीस तपासानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार असल्याचे म्हटले जात आहेपोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Akole Breaking Suicide of two girls with mother

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here