अकोले: इंदोरी फाट्यावर इको चार चाकी व दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू
Akole Accident: इंदोरी फाट्यावर भीषण अपघात. निब्रळच्या एका इसमाचा जागीच मृत्यू .
अकोले: कोल्हार घोटी राज्यमार्गावर इंदोरी फाट्याच्या पूर्वेला मोटारसायकल आणि इको गाडी यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री ही घटना घडली.
इंदोरी फाट्यावरील गणपत नवले यांच्या घरासमोर मंगळवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास रमेश गोविंद डावरे वय ४५ हे अकोलेहून निम्र्बळकडे जात असताना राजूरवरून अकोले कडे येत असलेल्या इको गाडीची जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता फार मोठी होती. यामध्ये रमेश डावरे हा इसम जागीच ठार झाला. अपघात घडताच स्थानिक तरुणांनी रुग्णवाहिका बोलावून डावरे यांना अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.
Web Title: Eco four wheeler and two wheeler accident on Indori Phata, one dead