Home अहमदनगर अहमदनगर: चारचाकी व दुचाकीच्या अपघातात एक जण ठार

अहमदनगर: चारचाकी व दुचाकीच्या अपघातात एक जण ठार

Ahmednagar Accident: चारचाकी गाडी आणि दुचाकी यांच्यात अपघात होऊन यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.

One person was killed in an accident involving a four-wheeler and a two-wheeler

कर्जत:  मालवाहतूक करणारी चारचाकी गाडी आणि दुचाकी यांच्यात अपघात होऊन यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  हा अपघात कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी फाट्याजवळील अतिथी ढाब्याजवळ झाला.

मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास जयदीप बापू मोरे (वय ३५, राहणार सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर) हे हिरो होंडा कंपनीच्या दुचाकीवरून कर्जतकडून राशीनकडे येत असताना राशीनकडून कर्जतकडे चाललेल्या टाटा ए. सी. वाहन यांच्यात अपघात झाला. यामध्ये जयदीप मोरे हे जागीच मयत झाले. याबाबत राशीन पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आज श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे दौऱ्यावर जात असलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अपघातस्थळी भेट दिली.

Web Title: One person was killed in an accident involving a four-wheeler and a two-wheeler

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here