संगमनेरात पैशांचा पाऊस! लाल गाडी आली, पाचशेच्या भरमसाठ नोटांची उधळण केली, तोबा गर्दी
Sangamner News: रस्त्यात एका लाल रंगाच्या कारमधून चक्क पाचशे रुपयांच्या नोटा उधळण्यात आल्या.
संगमनेर: संगमनेरच्या राजकारणाची सर्वत्र चर्चा असते. परंतु आता वेगळ्याच एका घटनेने संगमनेर चर्चेत आले आहे. येथे पाऊस झाला पण पैशांचा ! ऐकून आश्चर्य वाटेल पण ही घटना खरी आहे. त्याचे झाले असे की, भर रस्त्यात एका लाल रंगाच्या कारमधून चक्क पाचशे रुपयांच्या नोटा उधळण्यात आल्या. ते गोळा करण्यासाठी लोकांनीही वाहने थांबून गर्दी केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेने चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, , सोमवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास नाशिक रस्त्यावरील शेतकी संघाच्या पेट्रोल पंपासमोर एक कार आली. ही नाशिकच्या दिशेने निघाली होती. या कारमधून पाचशे रुपयांच्या नोटा उधळण्यात आल्या.
संध्याकाळची वेळ असल्याने विद्यार्थी, कामावरून सुटलेले कामगार आदींची गर्दी होती. अचानक पैशांची उधळण सुरु होताच सर्वच नागरिक पैसे गोळा करायला धावले. नागरिकांची झुंबड उडाली. त्यामुळे वाहनांचा खोळंबा होऊन ट्राफिक जॅम झाली.
अनेक वाहनचालक आपल्या गाड्या सोडून पैसे गोळा करायला धावले. ज्यांना पैसे मिळले ते आपले खिसे भरून लवकर निघून गेले. कारण जे मिळालं ते जायला नको असं वाटल्याने काढता पाय घेतला. ज्यांना काही मिळाले नाही ते मात्र तेथेच चर्चा करत थांबले होते. जवळपास अर्धातास हा पैशांचा तमाशा सुरु होता. वाहतूक खोळंबाही झालेला होता. असे असूनही पोलिसांना याची भनक लागली नाही हे विशेष. हा प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झालाय.
या नोटा किती रकमेच्या होत्या याबाबत माहिती तर नाहीच शिवाय या नोटा नकली असल्याचे सांगितले जात आहे. हा सगळं प्रकार गांभीर्याने घेऊन त्याच्या मुळाशी जाण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कार मधून उधळलेल्या नोटा नकली असल्याची चर्चा रंगली आहे. पोलीस तपासानंतरच काय खरे काय चुकीचे ते समोर येईलच. पोलीस सध्या याची माहिती घेत आहेत. पोलिसांचा अधिक तपास सुरु असून यातील सर्व बारकावे समोर येतीलच.
Web Title: Rain of Money in Sangamner
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App