Home अहमदनगर अहमदनगर: वडिलांवर हात उचलला; मित्राने संपविले मित्राला

अहमदनगर: वडिलांवर हात उचलला; मित्राने संपविले मित्राला

Breaking News | Ahmednagar: खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश.

raised his hand to his father A friend ends a friend

पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील अविनाश बाळू जाधव यांच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पंधरा दिवसांच्या तपासानंतर पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले असून, जाधव यांचा खून करणारा त्यांचा मित्रच निघाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमोल नवनाथ आठरे (वय २०, रा. कौडगाव आठरे, ता. पाथर्डी) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयत अविनाश जाधव व आरोपी अमोल आठरे हे दोघे चांगले मित्र होते. ते एकमेकांच्या घरी जात असे. मयत जाधव याला गांजा व दारू पिण्याचे व्यसन होते. त्यावरून आरोपीचे वडील दोघांनाही बोलत असे. एकेदिवशी आरोपीचे वडील दूध विकण्यासाठी तिसगावला गेले असता त्यांना मयत जाधव याने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील दूधही रस्त्यावर ओतून दिले. याबाबत आरोपीने मयत जाधव याच्याकडे विचारणा केली असता त्याने मित्र असलेल्या अमोल आठरे यास शिवीगाळ केली. त्याचा आरोपीला राग आला. त्याने अविनाश जाधव याला मारण्याचा कट आखला. ४ मे रोजी रात्री १२ ते एक वाजेच्या सुमारास आरोपी शेतातील कोयता घेऊन मयत जाधव याच्या घरी गेला. त्यावेळी जाधव पढवीत झोपलेला होता. सुरुवातील आरोपीने लाकडी दांडक्याने मारहाण केली. नंतर त्याने दुचाकीच्या सीटवर ठेवलेला कोयता आणून जाधव याच्या डोक्यावर व पाठीवर वार केले, अशी कबुली आरोपीने दिली. आरोपीला पुढील तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, सुरेश माळी, संतोष लोंढे, संदीप चव्हाण आदींच्या पथकाने केली.

मित्रातील वादामुळे लागला शोध

४ मे रोजी जाधव हे त्यांच्या घराच्या पढवीत झोपलेले होते. साधारण १२ ते एक वाजेच्या सुमारास कोयत्याने वार करून त्यांचा खून करण्यात आला. या परिसरात सीसीटीव्ही नव्हते. त्यामुळे पोलिसांना ठोस पुरावे मिळत नव्हते. पोलिसांनी मयत जाधव यांचा कुणाशी वाद झाला होता का, याचा शोध घेतला असता आरोपीचे नाव समोर आले.

Web Title: raised his hand to his father A friend ends a friend

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here