Home अहमदनगर अहमदनगर: युवतीचा मृतदेह पुलाखाली आढळला  

अहमदनगर: युवतीचा मृतदेह पुलाखाली आढळला  

Breaking News | Ahmednagar: उड्डाणपुलाजवळ रविवारी पहाटे एका १९ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला.

girl's body was found under the brigirl's body was found under the bridgedge

अहमदनगर: कल्याण रस्त्यावरील रेल्वे – उड्डाणपुलाजवळ रविवारी पहाटे एका १९ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला. मनीषा सुभाष बेलापूरकर (रा. झारेकर गल्ली, नालेगाव) असे मयत युवतीचे नाव आहे. तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेनंतर घातापाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

नालेगाव भागात लेडी डॉन मनी नावाने परिचित असलेल्या मनिषाचा मृतदेह पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी तिला मृत घोषित केले. खबरीवरून तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मनीषा हिच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर काहींनी घातपाताची शक्यताही व्यक्त केली. मात्र, तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. मयत मनीषा ही शनिवारी सकाळी घरातून गेली होती. त्यानंतर दिवसभरात ती घरी फिरकली नाही. रविवारी पहाटे तिचा मृतदेह आढळला. त्यामुळे तिच्या घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. शविच्छेदन अहवाल काय येतो, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: girl’s body was found under the brigirl’s body was found under the bridgedge

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here