Home अकोले पत्नीचा खून करून पती घराला कुलूप लावून पसार, अकोलेतील धक्कादायक घटना –...

पत्नीचा खून करून पती घराला कुलूप लावून पसार, अकोलेतील धक्कादायक घटना – Murder

Rajur Husband Murder wife and locks house

Akole | Rajur | राजूर: संशयाच्या कारणावरून पत्नीचा पतीने धारदार हत्याराने निर्घुन खून (Murder) करून त्यानंतर तो घराला कुलूप लावून पसार झाला. ही घटना अकोले तालुक्यातील शेलविहिरे येथे घडली. दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलाने घराचे कुलूप उघडले तेव्हा हा प्रकार समोर आला.

रंजना जगन्नाथ आडे (वय ४२ रा.शेवविहिरे) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार जगन्नाथ भागा आडे (रा.शेलविहिरे, ता.अकोले) याच्यावर राजुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १९ मे रोजी जा़लींदर आडे (वय-२६) हा कामासाठी बाहेर निघाला असता आई वडीलांमध्ये भांडण चालू होते. त्यावेळी जालींदरने दोघांना समजावून सांगितले व तो कामासाठी घराबाहेर पडले. रात्री ८ वाजता तो घरी आला असता घराला कुलूप दिसले असता त्याला वाटले आई वडील गेले असतील गेले असतील कोठे तरी बाहेर असा विचार करून जालींदर आपल्या मावस भावाकडे डोंगरवाडी येथे गेला.

मुलगा जालींदर याने वारंवार फोन करूनही आईकडून प्रतिसाद मिळत नव्हता. आई वडीलांची पार्श्वभूमी पाहता मुलाला संशय आला,  त्यामुळे मावस भावाला घेऊन तो शेलविहिरे येथे गेला तरी घराला कुलूप होते. त्यामुळे त्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता त्यावेळी त्याला आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.

आईचा मृतदेह पाहून मुलाने एकच टाहो फोडला. वडीलांचे सकाळी आई बरोबर सुरु असलेले भांडण पाहता मुलाला वडीलांचा संशय आला. त्यामुळे देवगाव येथून मामाला घेऊन आला व त्यांनी याबाबत पोलीस स्टेशनला माहिती दिली. घटनेचा पंचनामा करून पोलीसांनी गुन्हा र.जि.नं ३०२,२०१ प्रमाणे दाखल केला आहे. अधिक  तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस करीत आहे.

Web Title: Rajur Husband Murder wife and locks house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here