माझ्यासोबत लग्न कर, प्लॉट तुझ्या नावावर करतो असे म्हणत महिलेसोबत…
Ahmednagar | अहमदनगर: माझ्यासोबत लग्न कर प्लॉट तुझ्या नावावर करतो असे म्हणत अश्लील हावभाव करीत महिलेचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी एकावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक तुकाराम गव्हाणे रा. श्रीराम चौक सावेडी असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद दाखल केली आहे. सदर महिलेच्या घराशेजारी जागेत आरोपी व त्याच्या वडिलांनी खड्डा खोदण्यासाठी कामगार पाठविला होता. त्यामुळे फिर्यादीच्या पतीने जागेचा वाद न्यायालयात सुरु असल्याने इथे खड्डा खोदू नका असे सांगितल्याने कामगार तेथून निघून गेला. त्यानंतर काही वेळातच तिथे आरोपी व त्याचे वडील आले त्यांनी पतीला शिवीगाळ केली. त्यामुळे पती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते.
त्याचवेळी आरोपी घरी आला. सासूबाईना शिवीगाळ करू लागला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेच्या समोर येऊन अश्लील हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत पोलिसांनी विनयभंगप्रकरणी (Molestation) गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Molestation a woman by making obscene gestures