Home संगमनेर संगमनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वीज पडून गायी दगावली

संगमनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वीज पडून गायी दगावली

Sangamner taluka, rain accompanied by strong winds, lightning struck and killed cows

Sangamner | संगमनेर: वादळी व सुसाट वारा व मेघगर्जेनेसह शुक्रवारी रात्री अर्धा तास अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने (rain) शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली. काढणीस आलेल्या गहू, हरभरा, व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पठार भागासह अनेक भागात गहू झोपल्याने शेतकरी चिंतेत आहे.

शुक्रवारी रात्री साडे सात वाजता शहरासह तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली, काढणीला आलेला गहू अक्षरश झोपून गेला. मक्याचे पिक पडले. पठारातील खंदरमाळ येथील शेतकरी बाळासाहेब भागवत यांच्या गायीवर वीज पडल्याने ती दगावली (Death). नुकसानीची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही. नुकसान क्षेत्राचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सीताराम पानसरे व शेतकऱ्यांनी केली आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला आहे.  

Web Title: Sangamner taluka, rain accompanied by strong winds, lightning struck and killed cows

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here