Home संगमनेर पत्नी नांदायला येत नाही! मग संगमनेरचा ‘वीरू’ थेट चढला हायव्होल्टेज टॉवरवर, शोले...

पत्नी नांदायला येत नाही! मग संगमनेरचा ‘वीरू’ थेट चढला हायव्होल्टेज टॉवरवर, शोले स्टाईल आंदोलन

Sangamner youth sholly Style agitation

Sangamner | संगमनेर:  बायको नांदायला येत नसल्यामुळे संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी येथील तरूणाने जुन्नर तालुक्यात चक्क हायव्होल्टेज टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन (agitation) केले. केशव बबन काळे (वय २३) असे या वीरू तरुणाचे नाव आहे.

पिंपळगाव सिद्धनाथ (ता. जुन्नर, जिल्हा पुणे) येथे ही घटना गुरुवारी (१९ मे) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. जोपर्यंत पत्नी बरोबर येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे त्याने उपस्थितांना सांगितले. त्याने सोबत दोरी देखील नेली होती. या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी त्याच्या पत्नीला समोर आणून समझोता करण्याचे आवाहन केल्यानंतर सदर तरुण सायंकाळी चार वाजता टॉवरवरून खाली उतरला.

केशव काळे या युवकाचे गोद्रे (जुन्नर) येथील मुलीसोबत डिसेंबर २०२१ मध्ये कुरकुंडी घारगाव येथे विवाह झाला होता. पती-पत्नीमध्ये होत असलेल्या वादामुळे त्याची पत्नी माहेरी गोद्रे येथे आई वडिलांकडे राहण्यास आली. गुरुवारी हा तरूण तिला सासरी नांदण्याकरीता घेऊन जाण्यास आला असता पत्नीने सोबत येण्यास नकार दिला, त्यानंतर केशव काळे हा युवक थेट हायव्होल्टेज टॉवरवर चढला.

या तरुणाची बायको नांदायला येत नसल्याने त्याने वेगळीच शक्कल लढवली. त्याने आपली मागणी पूर्ण व्हावी म्हणून थेट पिंपळगाव सिध्दनाथ गावातील पेट्रोल पंपासमोर असलेल्या हाय व्होल्टेज टॉवरवर चढून बसला. याबाबत येथील पोलीस पाटील यांनी पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पत्नीला समोर आणून समझोता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तो खाली उतरला. यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

याबाबत मुलीचे वडील रोहिदास भोजने यांनी सांगितले की,  ६ महिन्यांपूर्वी केशवच्या दमदाटीला कंटाळून हे लग्न लावून दिले होते. चाकण येथे कामानिमित्त झालेल्या ओळखीतून केशवने या मुलीसोबत लग्न लावून द्या, असा तगादा लावला होता. लग्नानंतरही गावातील डोंगराच्या कड्यावर चढून या तरुणाने धमक्या दिल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितले. यापूर्वी भोजने यांनी याबाबतच्या दोन तक्रारी जुन्नर पोलिसांकडे दिल्या होत्या. दरम्यान सदर मुलगी मारहाण होत असल्याने सासरी नांदायला तयार नसून जुन्नर पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Titile: Sangamner youth sholly Style agitation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here