Home अकोले राजूर: कै. रा. वि. पाटणकर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

राजूर: कै. रा. वि. पाटणकर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

कै. रा. वि. पाटणकर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी -सत्यनिकेतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. बापुसाहेब शेंडे, संस्थापक सचिव कै.रा.वि. पाटणकर, संस्थापक कोषाध्यक्षा कै. सावित्रीबाई मदन या त्रीमूर्तींनी आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे उचित स्मरण व्हावे म्हणून त्यांच्या नावाने आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
गुरूवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर राजुर( ता.अकोले ) येथे कै.रा.वि. पाटणकर स्मृतीचषक आंतरविदयालयीन तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.
यामध्ये तालुक्यातील २६ विदयालयातील एकूण ४४ विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या वक्तृत्व स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टि. एन. कानवडे हे होते. तर प्रमुख उद्घाटक म्हणून अकोले कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. सुनिल शिंदे हे उपस्थित होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन सहसचिव मिलिंद उमराणी,माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, संचालक एम.बी. वाकचौरे, यांसह विदयालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य लहानु परबत, पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव मिलिंद उमराणी यांनी केले.
यावेळी इयत्ता ५वी ते ७वी या लहान गटात अकोले येथील कन्या विदया मंदिर विदयालयातील प्रांजल धुमाळ हिने प्रथम क्रमांक मिळवून १५०१ रुपयाचे बक्षिस मिळविले, आढळा विद्यालय देवठाण येथील ईश्वरी सहाणे हिने द्वितीय क्रमांक मिळवून १००१रूपयाचे बक्षिस मिळविले. तर अभिनव पब्लिक स्कुल अकोले येथील आदिती पवार हिने तृतीय क्रमांक मिळवून ७०१रूपयाचे बक्षिस मिळविले.
त्याचप्रमाणे इयत्ता ८वी ते १०वी या मोठ्या गटात अगस्ती विद्यालय अकोले येथील विवेक सदगिर याने प्रथम क्रमांक मिळवून १५०१रूपयाचे बक्षिस मिळविले, अकोले कॉलेजची अपूर्वा फापाळे तसेच सर्वोदय विद्या मंदिर राजूर येथील संस्कृती शिंदे यांनी द्वितीय क्रमांक मिळवून प्रत्येकी ५०१रूपयाचे बक्षिस मिळविले. तर सर्वोदय विदया मंदिर खिरविरे येथील ऋतुजा डगळे हिने तृतीय क्रमांक मिळवून ७०१रूपयाचे बक्षिस मिळविले. तसेच या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना टॉफी व प्रमाणपत्रही देण्यात आले.
यावेळी परीक्षक म्हणून नरेंद्र राठोड, प्रा.निलेश वाकचौरे, प्रा.डॉ.डी. के. गंधारे, प्रा.बी.के.थोरात यांनी काम पाहीले.
यावेळी दिपक पाचपुते, गोरक्ष शिंदे,संतराम बारवकर, प्रविण मालुंजकर, जालिंदर आरोटे यांनी यशस्वी नियोजन केले तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
बक्षिस वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक पाचपुते यांनी केले.
सुत्रसंचालन संतराम बारवकर यांनी केले. तर संचालक अशोक मंडलिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here