Home अहमदनगर शिर्डी मतदार संघ भाजपास सोडण्यात येऊ शकतो: ना. राम शिंदे

शिर्डी मतदार संघ भाजपास सोडण्यात येऊ शकतो: ना. राम शिंदे

अहमदनगर: राधाकृष्ण विखे यांनी भाजापामध्ये प्रवेश केला आहे. ते शिर्डी या विधानसभा मतदार संघातून निवडून येत असल्याने शिर्डी मतदार संघ हा भाजपास सोडण्यास येऊ शकतो त्याचबरोबर इतरही ठिकाणी विधानसभेसाठी नवीन जागा वाटप होतील. असे राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी माजी खा. दिलीप गांधी, खा. सुजय विखे, आ. शिवाजीराव कर्डिले,बबनराव पाचपुते, बाळासाहेब मुरकुटे आदि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री यांची महाजानादेश यात्रा हि २५ व २६ ऑगस्टला होत आहे. २५ तारखेला सकाळी शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस येणार आहेत. त्यानंतर लोणीला जाऊन राधाकृष्ण विखे यांची सांत्वन भेट घेणार आहेत. यानंतर दुपारी २ वाजता अकोले येथे महाजनादेश सभा होणार आहे तर दुपारी ३ वाजता संगमनेर येथे मालपाणी लोन्समध्ये सभा होईल. राहुरी येथे सभा होऊन नगरला मार्गस्थ होणार आहेत. नगर शहरातून सायंकाळी सात वाजता गांधी मैदानात सभा होणार आहे.

यावेळी सुजय विखे यांनी सांगितले की, नगर जिल्ह्यात युतीच्या बारा जागा येतील तसेच युती न झाल्यास बाराही जागा लढवून सर्व जागा भाजपा जिंकेल असे सांगितले.  

Website Title: Ram Shinde MLA Shirdi constituency may be released from BJP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here