Home अकोले अकोले: बसच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी

अकोले: बसच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी

अकोले: अकोले आगाराची कासाराहून अकोलेकडे येणाऱ्या बस व मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत मोटारसायकलवरील म्हाळादेवीचा युवक गंभीर जखमी झाला असल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अकोले राजूर रस्त्यावर माळीझाप शिवारात ओढ्याजवळ घडली. या अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव शुभम भरत हासे वय १९ रा. म्हाळादेवी ता.अकोले असे आहे.

अकोले आगाराची कसारा अकोले बस क्रमांक एम.एच. १४ बी. टी. ४१२९ हि अकोले जवळ येत असतानाच माळीझाप शिवारातील पान ओव्हळ ओढ्याजवळ असणाऱ्या कॉर्नरवर अकोलेतून म्हाळादेवीकडे मोटारसायकल क्रमांक एम.एच. १७ ए.आर. ३६८४ वर जाणारा शुभम भारत हासे याच्या दुचाकीची जोराची धडक झाली. यामध्ये मोटारसायकलस्वार शुभम हासे गंभीर जखमी झाला आहे. त्यास अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याला डोके हात व पायाला गंभीर जखमा झाल्या असल्याने संगमनेर येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. शुभमचे वडील वनखात्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. शुभम हा सध्या अकोले महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. याबाबत अकोले आगाराचे एस.टी. चालक अनिल दिनकर साठे रा.टाकळीभान ता. श्रीरामपूर यांनी अकोले पोलीस ठाण्यात उशिरा खबर दिली. त्यानुसार मोटार अपघात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा भोसले हे करीत आहे.   

Website Title:  Akole Bus and Two-wheeler seriously injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here