Home अकोले राजूर: पोलिसांची धडक कारवाई अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

राजूर: पोलिसांची धडक कारवाई अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

राजूर: अकोले तालुक्यात शेंडी, भंडारदरा, अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी, कोकणकडा, घाटघर या ठिकाणी फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी सलग सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची वर्दळ असल्याने येथील व्यावसायीकानी अवैधरीत्या दारू विक्री सुरु केली होती.या अवैध दारू विक्रीची माहिती पोलीसांना समजली. रंधा येथील व्यावसायीकेच्या हॉटेलवर राजूर पोलिसांनी अचानक छापा टाकुन सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या छाप्याने व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी अशा कडक कारवाई करत राहिल्यास अवैध धंद्यांना मोठा चाप बसेल असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

अकोले तालुक्यातील राजूर येथील पोलिसांची अवैध धंद्यावर छापे ऐन १५ ऑगस्ट अगोदर केली. दारू विक्रेत्यावर कडक कारवाई राजूर पासून जवळच बेकायदेशीर हॉटेल असलेल्या रंधा येथे दारू विक्रेत्यावर छापा टाकला. या छाप्यात इंडिका गाडी क्रमांक एम.एच.०२ सीआर ८९८८ गाडीची किमत अडीच लाख रुपये असून दारू मुद्देमाल ५४७६ रुपयांचा एकूण सर्व मुद्देमाल २,५५,४७६ रुपयांचा मुद्देमालासह पकडण्यात आला. यावेळी राजूर येथील सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रवीण थोरात, अशोक गाडे, रवींद्र वाकचौरे आदींनी कारवाई केली.

Website Title: Rajur Police crackdown seizes 2.5 lakh issues

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here