Home अकोले नगर जिल्हा विभाजनाची जबाबदारी आता ना.विखे व पिचडांवर: ना. राम शिंदे

नगर जिल्हा विभाजनाची जबाबदारी आता ना.विखे व पिचडांवर: ना. राम शिंदे

अकोले: राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करावे अशी गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी आहे. परंतु राज्यकर्ते वेळोवेळी या मागणीला पाणी लावत आले आहे. जिल्हा विभाजनाचे ठोस आश्वासन देणाऱ्या पालकमंत्री राम शिंदे यांनी आश्वासनाची पूर्तता न करता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जिल्हा विभाजनाचे गाजर दाखविले आहे. आता तर ना. शिंदे यांनी या विषयात ना. विखे व माजी मंत्री मधुकर पिचड यांना ओढल्याने या प्रश्नावर पुन्हा एकदा राजकारण पेटले आहे.

विस्ताराने मोठ्या असलेल्या नगर जिल्ह्याचे विभाजन करावे यासाठी संगमनेर, अकोलेकारांची मोठा  लढा दिला असून संगमनेर जिल्हा करावा हि एकमुखी मागणी लावून धरली आहे. उत्तरेतील अनेक नेत्यांनी या मागणीला पाठींबा दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्याचे मुख्यालय कोणते या प्रश्नावर चर्चा व निर्णय घेतले जात नाही.

दरम्यान पालकमंत्री राम शिंदे यांनी अनेक जाहीर सभांमधून जिल्हा विभाजनाच्या वल्गना केल्या आणि हा निर्णय मीच करणार असे छातीठोकपणे सांगितले मात्र आता दुसरी पंचवार्षिक येऊ घातली आहे. परंतु या आश्वासनाची पूर्तता झाली नाही.

आता मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यासाठी त्यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री मधुकर पिचड यानांच जिल्हा विभाजन करायचे असते तर अगोदरच केले असते. त्यामुळे ना. शिंदे यांची हि पळवाट असून त्यांनाही हा प्रश्न भिजत ठेवण्यातच रस आहे.

विखे पिचड भाजपमध्ये आल्याने जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपकडून जिल्हा कॉंग्रेस मुक्त चा नारा दिला जात आहे. परंतु यासाठी सर्वात मोठा अडसर असलेल्या कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनाही निमंत्रण दिले जात आहे. परंतु विचारांशी आणि कृतिशी पक्के असणारे आ. थोरात हे कदापीही भाजपात जाणार नाही. तसेच विखे पिचड भाजपमध्ये सामील झाल्याने राम शिंदे यांचे महत्व कमी झाले आहे. या दोन्ही जेष्ठ नेत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जिल्हा विभाजनाच्या गोळ्या झाडल्या जात आहे. तो ही निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे पुन्हा एकदा जनतेच्या भावनांशी खेळ खेळला जात आहे.  

Website Title: Ram Shinde MLA the responsibility of dividing the city district Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here